
उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश वाले,किल्लारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा पाटील यांनी केले.उमरगा-लोहारा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील कडवट शिवसैनिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, आमदार चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी उमरगा शहरातून निषेध रैली काढण्यात आली.

या रॅलीदरम्यान आमदार चौगुले गद्दार असल्याबाबत घोषणा दिल्या. रॅलीमध्ये बाबा पाटील,सुरेश वाले, विष्णू पाटील, प्रवीण पाटील, माधव सूर्यवंशी, संतोष कलशेट्टी, सुनील पाटील, शिवाजी मदने, रणजीत सास्तुरे, दादा चौधरी,विनोद पवार, शैलेश पवार, योगेश भोळे, दीपक चव्हाण, स्वप्नील वाले,शांतू म्हेत्रे, विजय फडताळे, विष्णू शिंदे,चंदर पाटील, ज्ञानराज चव्हाण, बाळू काळे, आबासाहेब चौधरी, मनोज जमादार, मनोज मोरे, गणेश मुगळे,श्रीकर बिराजदार, विठ्ठल पवार, दत्ता राजपूत, सुधीर धुमाळ, राहुल भोसले आदी सहभागी झाले होते.