
कळंब(राजकीय कट्टा प्रतिनिधी) मागील वर्षी कोव्हिड काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे सर्व छोटे – मोठे व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद होते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती त्या आर्थिक संकटातून अजुनही छोटे – मोठे व्यापारी पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत.
मागील वर्षी लॉकडाऊन संपल्यानंतर व्यापारी वर्गाने बँकेतून कर्ज घेऊन आपला व्यवसाय नव्याने सुरु केला पण बाजारपेठ मंद असल्यामुळे व्यापारी आर्थिक दृष्ट्या मजबुत झाला नाही आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन लागल्यामुळे ज्याचं नाव आता “ब्रेक द चैन” असं ठेवलं आहे. “ब्रेक द चैन” च्या नियमानुसार पुन्हा एकदा दुकान बंद करावं लागत आहे. दुकान बंद असल्यावर आम्ही खायचं काय? कुटुंबाच्या गरजा कशा पुर्ण करायच्या? बँकेचे हफ्ते कशा पद्धतीने फेडायचे? अशा प्रकारचे भरपूर प्रश्न व्यापारी वर्गासमोर उपस्थित झाले आहेत.
त्यामुळे आम्हाला हा लॉकडाऊन ( ब्रेक द चैन ) मान्य नाही. आणि आता आम्हाला मरणाशिवाय कोणताच पर्याय समोर दिसत नाहीये तरी आपण आम्हाला व्यवसाय करण्याची किंवा सहकुटुंब आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी ही मागणी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघ कळंब यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देऊन केली आहे या निवेदनावर जवळपास ८४ व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.