
वाशी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) शिवसेनेचे उपनेते माजी जलसंधरण मंत्री तथा भूम-परंडा-वाशी चे विकास रत्न आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलींना चांदीचे पैंजण देऊन स्त्री जन्माचे स्वागत करून आमदार सावंत यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वाशी पंचायत समिती सदस्य सौ. सविता विकास तळेकर शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र धर्माधिकारी, शिवसेना वाशी उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, पत्रकार बंडू मुळे,सुरेश उंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे,महेश गिराम,आदी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.