
परंडा (राजकीय कट्टा प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील अनाळा येथे ग्रामपंचायत वतीने योद्धा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत माजी सभापती पैलवान नवनाथ जगताप सरपंच अंबिका क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे,अंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पठाण, ग्लोबल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर,वैद्यकीय अधिकारी अमृता भांडवलकर, उद्योजक हनुमंत पाटील, कांतीलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आनाळा ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मध्ये काम करणारे आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, बचत गट महिला, पोलीस अधिकारी, शैक्षणिक व सांस्कृतिक वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी जोतीराम क्षिरसागर, बिभिषण शिंदे, भारत जाधव,पत्रकार निशीकांत क्षिरसागर, उपसरपंच दादा फराटे,नारायण क्षिरसागर, मलकापुरचे सरपंच कैलास तेरकर, रत्नापुरचे सरपंच श्रीराम देवकर,ग्रा.प.सदस्य अजित शिंदे, कल्याण शिंदे, सौ अर्चना कदम, सौ स्वाती चव्हाण, सुनिता शिंदे, भाऊसाहेब क्षिरसागर, चांगदेव चव्हाण, अरूण चोपडे, रेवन्नाथ कदम, हनुमंत क्षिरसागर,आबांदास क्षिरसागर, रमेश क्षिरसागर,लक्ष्मण क्षिरसागर, हारी शिंदे,साजिद शेख, अशोक शिंदे,बप्पा जाधव, रेवन्नाथ शिंदे,तुकाराम शिंदे, सुभाष वाघमारे, आप्पाराजे वामन, इश्वर क्षिरसागर, तानाजी गीलबीले, स्टार हिवरे, नवनाथ शिंदे, अमोल हिवरे, प्रशांत क्षिरसागर, अलीम शेख, नागनाथ राऊत, नवनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, बालाजी शिंदे, इ. मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोमनाथ कदम यानी तर कार्यक्रमाचे आभार निशीकांत क्षिरसागर यांनी मानले.
