भूम(राजकीय कट्टा प्रतिनिधी)भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे हे गाव द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. या गावात काल रात्री नऊ ते पहाटे साडेचार असा संततधार अवकाळी पाऊस पडल्यामुळे येथील द्राक्ष बागायत यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे चिंचपूर ढगे या एका गावात जवळपास दीडशे ते दोनशे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांच्या द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यासंदर्भात तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र अद्याप कोणताही शासकीय अधिकारी या शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी आलेला नाही.त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिक कालच्या पावसामुळे वाया गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे मनी या पावसामुळे गळून पडले आहेत.

कालच या अवकाळी पावसामुळे माझ्या द्राक्ष बागाचे खूप मोठे नुकसान झाले असून या नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे पंचनामे तात्काळ करावेत व शासनाकडून मदत मिळावी तरच शेतकऱ्याने केलेला किमान खर्च तरी निघेल अशी आशा आहे.
तानाजी विधाते (द्राक्ष बागायतदार चिंचपूर ढगे)