भुम (राजकीय कट्टा प्रतिनिधी)
भूम तालुक्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी , गहू, हरभरा,कांदा द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झाले.तरी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकांचे पंचेनामे करून तात्काळ मदत मिळावी यासाठी नायब तहसीलदार भुम यांना राष्ट्रवादी मिडीया व राष्ट्रवादी दिव्यांग सेल वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी मिडीया तालुकाध्यक्ष प्रदिप ढगे – पाटील व राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदिप डोके तसेच राष्ट्रवादी लिगल सेल चे तालुकाध्यक्ष अॕड. संदिप ढगे-पाटील,दिव्यांग सेलचे सचिव रियाज पठाण,उपाध्यक्ष हनुमंत बोराडे,अॕड.सुरेश ठोबंरे द्राक्षें बागायतदार अनिल गोडींबा कसबे, सलीम शेख, ढगे बप्पा,विश्र्वनाथ माळी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.