

आयपीएल २०२१
हर्षलची गोलदांजी व ए बी डीविलर्सच्या फलंदाजीने बेंगलोरचा विजय
चेन्नई राजकीय कट्टा (क्रीडा प्रतिनिधी)- आजपासून आयपीएलच्या १५ व्या मोसमाला सुरुवात झाली.चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यांमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दोन गड्यांनी मात करत हा सामना जिंकला.गेल्या ९ वर्षापासून मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात पराभूत होण्याचा इतिहास याही मोसमात कायम राहिला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा मुंबई इंडियन्सला आमंत्रित केलं रोहित शर्मा मात्र १८ धावा केल्या व मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा धावबाद झाला. त्यानंतर मुंबईचा डाव क्आरिस लिन व सूर्य कुमार यांनी सावरत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारण्याची पायाभरणी केली.मात्र शेवटच्या चार षटकात रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश मिळवले व मुंबई इंडियन्स चा डाव १५९ धावावर आटोपला. हर्षल ने पाच विकेट घेत आपला वरचष्मा दाखवून दिला तर मुंबई इंडियन्सकडून क्रीस लिनने ४९
सुर्यकुमार यादव ने ३१ धावा केल्या.
१६० धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा डाव कर्णधार विराट कोहलीने चांगल्या पद्धतीने सावरला. मात्र त्यानंतर १० ते १३ षटकाच्या दरम्यान बेंगलोर चॅलेंजर्सच्या तीन विकेट लवकर बाद झाल्यामुळे परत मुंबई इंडियन्सचे पारडे या सामन्यात जड झाले. मात्र त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने आपला गतवर्षीचा फॉर्म कायम राखत मुंबई इंडियन्सच्या तोंडचा विजय पळवण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटच्या षटकात सहा चेंडूत सात धावाची गरज असताना ए.बी.डीविलर्स हा दोन धावा कमी असताना धावबाद झाला आणि परत एकदा दोन चेंडू दोन धावा असं समीकरण बनलं. मात्र शेवटच्या दोन चेंडूवर दोन धावा घेत शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सवर दोन गड्यांनी विजय मिळवला.
रॉयल चॅलेंजर्स कडून ए बी डीविलर्सने सर्वाधिक ४८ धावा तर मॅक्सवेल यांनी ३९ व कर्णधार विराट कोहली याने ३३ धावा बनवल्या तर मुंबईकडून जसप्रीत बुमराह व जॕनसेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
राजकीय कट्टाच्या क्रीडा प्रतिनिधीचा हा लेख आवडल्यास इतरांना शेअर करा